समाधान आवताडे: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विकासाभिमुख व व्हिजनरी नेतृत्व आहे
पंढरपूर विधानसभा 2024 आमदार समाधान दादा आवताडे हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते आहेत, आणि त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. थेट जनसंपर्क, पायाभूत सुविधा, कृषी कल्याण, शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये विकास साधण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान दादा आवताडे यांनी जनतेच्या गरजा समजून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यावर विशेष भर दिला, ज्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा शहर तसेच ग्रामीण भागामध्ये त्यांची प्रतिमा शब्द पाळणारा नेता म्हणून निर्माण झाली आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि नेतृत्व शैली
पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे, हे भाजपच्या “सबका साथ, सबका विकास” या तत्त्वावर आधारित कार्य करतात. आपल्या मतदारसंघातील विविध समस्यांचे निराकरण करून, आमदार आपल्या गावात या उपक्रमाद्वारे सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. यामुळेच पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे हे नाव पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेमध्ये दादांसोबत एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
पंढरपूर-मंगळवेढ्यातील प्रमुख विकास प्रकल्प
पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास
पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वाखालील विकासामध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले गेले आहे. अनेक नवीन रस्त्यांचे काम करण्यात आले आहे, तसेच पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण व दुरुस्ती करण्यात आली आहे. याशिवाय, ओढे-नाली ओलांडण्यासाठी नवे पूल बांधून वाहतुकीस अधिक सोयीस्कर करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांचे योजनाबाह्य रस्ते मंजूर करत स्वातंत्र्यापासून न झालेले अनेक रस्त्यांना निधी दिला. ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या शेती उत्पादनांची मुख्य रस्त्यांपर्यंत वाहतूक करणे सुलभ झाले आहे.
शेती आणि शेतकरी कल्याण
“मी दुष्काळात जन्माला आलो असलो तरी दुष्काळात मारणार नाही” हा दिलेला शब्द पाळत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी मंगळवेढ्यातील २४ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अथक मेहनत करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवत आणि योजनेचं भूमिपूजन करत मंगळवेढ्याच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम दादांनी केलं. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचं काम सुरु करत दादांनी वर्षानुवर्षे आश्वासनांच्या भुलथापांत अडकलेल्या २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचं कार्य दादांनी केलं आणि दिलेला शब्द पाळला.
नदी उशाला अन कोरड घशाला अशा अवस्थेत अडकलेल्या तामदर्डी सह १२ गावांतील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा पण वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या भीमा नदीवरील तामदर्डी बंधाऱ्याचे काम सुरु करत शेतकऱ्यांना दादांनी हक्काचं पाणी दिल. कमी विद्युत दाबाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १० सबस्टेशन मंजूर केले. मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी विविध योजनांमधून ५०० पेक्षा जास्त रोहित्र (डीपी) दिले.
सामाजिक कल्याण आणि महिला सशक्तीकरण
पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. मतदारसंघातील आपल्या लाडक्या बहिणींमध्ये आपण खंबीरपणे पाठीशी असल्याची भावना निर्माण व्हावी यासाठी संवाद मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रमांचं आयोजन करत ७० हजारपेक्षा जास्त भगिनींशी संवाद साधला. बहीण भावाचं नातं हे किती पवित्र आणि निखळ असतं याची प्रचिती मरवडे येथील संवाद मेळाव्यात आली. आमदार समाधान दादा आवताडे रक्षाबंधनानंतर संवाद साधत असताना गजबजलेल्या कार्यक्रमात घामाने डबडबून गेले होते. पण हजारोंच्या गर्दीतून डोणज गावातील एक भगिनीने थेट स्टेजवर येत आपल्या लाडक्या भावाच्या चेहऱ्यावरील घाम पुसत बहीण भावाचं नातं हे किती निखळ असतं याच जणू दर्शनच दिलं.
शैक्षणिक सुविधा आणि कार्य
पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी भरीव योगदान देत अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांसाठी ८१ वर्गखोल्यांच बांधकाम करून दिले. मतदारसंघात पाणंद रस्ते व योजना बाह्य रस्त्यांची कामे करत पाठीवर दफ्तर घेऊन शाळेपर्यंत चिखल तुडवत येणाऱ्या लहान थोर विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
आरोग्य सुविधा
पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे यांनी पंढरपूर कॉटेज हॉस्पिटल साठी २०० बेडची मंजुरी आणत त्याचे काम देखील पूर्णत्वास आणले. राज्यसरकाराकडे पाठपुरावा करत पंढरपूर येथे १००० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलला आलेली मंजुरी हि आरोग्य सुविधा क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही. मंगळवेढा शहरात १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय तसेच निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी आणत ग्रामीण भागापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचं कार्य आमदार समाधान आवताडे यांनी केलं आहे.
मंदिरे – धार्मिक पर्यटन विकास चालना
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करणेसाठी २२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम पूर्णत्वास आले आहे. वारकऱ्यांच्या दर्शनरांगेसाठी व सोयी सुविधांसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर स्काय वॉकला तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत मंजुरी मिळवली.
राष्ट्रमाता जिजाऊ पुतळा, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुतळा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. गावोगावी लोकांना एकत्र येता यावे यासाठी समाजमंदिर, समाजभवन, सभामंडप बांधले.
आव्हाने आणि भविष्यातील योजना
पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान आवताडे यांनी मिळालेल्या अल्प कालावधीत मिळालेल्या संधीचे सोनं करत विविध विकासकामे केली आहेत. विकासकामांची गंगा अखंडित ठेवणे आणि मंजूर कामे मार्गी लावणे हे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. २४ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे, पंढरपूर एमआयडीसी विकसित करून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणे अशा विविध विषयांवर भरीव योगदान देण्याचा मानस आहे.
निष्कर्ष
पंढरपूर आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण या सर्वच क्षेत्रांत त्यांनी केलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या कार्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आधुनिक विकासाचा आदर्श निर्माण झाला आहे.
समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील या प्रगतीशील कार्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल आहे, ज्याचा फायदा आजच्या तसेच उद्याच्या पिढ्यांना होणार आहे.